राजकारण

जि.प.,पं.स.निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार – अमरसिंह पंडित

 

सात गावच्या सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहिर प्रवेश

गेवराई प्रतिनिधी
सत्तेत असताना ज्यांना कामे करता आली नाहीत ते स्वतःची निष्क्रियता लपविण्यासाठी विरोधी पक्षात असल्याचे कारण पुढे करत आहेत. विरोधी पक्षातून गेवराईचे प्रतिनिधीत्व करताना ६५ गावांच्या रस्त्यांना भरघोस निधी मिळवून अनेक विकासाची कामे केली असे सांगून अमरसिंह पंडित यांनी विद्यमान आमदाराच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेवून तालुक्यात विकास कामे करणार, विकास कामांच्या जोरावर ही निवडणुक आपण जिंकणार असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्‍वास अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील पाचेगाव, सिरसदेवीसह सात सरपंचांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.

गेवराई तालुक्यातील पाचेगाव व सिरसदेवी या जिल्हा परिषद गटाच्या ग्रामपंचायतीसह टाकळगाव, हिंगणगाव, भेंड, वसंतनगर तांडा आणि ढालेगाव येथील सरपंच व रामपुरी, तपेनिमगाव येथील भाजपा-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत केले. सरपंच इमु पटेल, रविंद्र गाडे, संजय राठोड, अरुण तौर, त्रिंबक मदने, ज्ञानेश्‍वर खरात, योगेश गव्हाणे, नंदकुमार जंगले, उदयसिंह मस्के, शरद शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला. राजकीयदृष्ट्या या पक्षप्रवेश सोहळ्याला भविष्यातील निवडणुकीच्या दृष्टीने दिशादर्शक मानले जात आहे. माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित आणि माजी आ.अमरसिंह पंडित यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी कार्यक्रमाला जयभवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, ज्येष्ठ संचालक पाटीलबा मस्के, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगनपाटील काळे, सभापती बाबुराव जाधव, बाळासाहेब मस्के, उपसभापती शाम मुळे, माजी सभापती अप्पासाहेब गव्हाणे, कुमारराव ढाकणे, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, शेख हन्नानसेठ, माऊली आबुज, प्रताप पंडित, श्रीराम आरगडे, शेख मिनहाज, गणेश बांगर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होतेे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »