बीड जिल्ह्यातील हा युवा नेता कोरोना पॉझिटिव्ह
लोकगर्जना न्यूज
राज्यातील काही मंत्री, आमदारांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती युवा नेते अक्षय मुंदडा यांचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
राज्यातील १० मंत्री व २० आमदार कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. या पाठोपाठ युवा नेते केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा हे कोरोना बाधित असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. याची माहिती त्यांनी स्वतः फेसबुकवर माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेत आहे.माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व आपली काळजी घ्यावी असे आवाहन अक्षय मुंदडा यांनी केले आहे.