जिल्हा परिषद, पंचायत समितीवर प्राशासक

निवडणका लांबणार असल्याने इच्छुकांना वातावरण निर्मितीसाठी मिळणार वेळ
लोकगर्जना न्यूज
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका वेळेत होण्याची शक्यता धूसर झाली असून त्यामुळे प्राशासक नेमण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून मुख्यकार्यकारी अधिकारी ( सीईओ ) तर पं.स. चे प्रशासक म्हणून गट विकास अधिकारी ( बीडीओ ) पहाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लांबणार असल्याने इच्छुक उमेदवारांना वातावरण निर्मितीसाठी वेळ मिळणार आहे.
चालू मार्च महिन्यात राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची मुदत संपणार आहे. जवळपास पुढील ४ महिने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेणं शक्य नाही. मुदत संपल्यानंतर या दोन्ही म्हत्वाच्या संस्थेवर प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य सरकारने घेतला आहे. बीड जिल्ह्यातील ११ पंचायत समितीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुद्दत उद्या रविवारी ( दि. १३ ) मार्चला संपणार आहे. त्यामुळे उद्या पासून पंचायत समितीचा कारभार गटविकास अधिकारी प्रशासक म्हणून पहाणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेची मुदत ( दि. २० ) मार्च रोजी संपणार आहे. येथे ( दि. २१ ) मार्च प्रशासक म्हणून सीईओ अजित पवार यांची नियुक्ती होईल. जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाचा कारभार सीईओ पहाणार आहेत. जि. प., पं.स. निवडणूका जवळ आल्याने ग्रामीण भागातील पुढारी अधिक सक्रिय झाले होते. निवडणूका संपल्या की, शहरात विसावलेले पुढारी गावा-गावात फिरताना दिसत होते. येणारी निवडणूक सोपी जावी म्हणून साखर पेरणी सुरू केली होती. परंतु निवडणूका पुढं गेल्याने काही काळ या गाटी भेटीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. परंतु नवीन निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवारांसाठी हा निर्णय पथ्यावर पडला असल्याचे बोलले जात आहे. त्यांना आता लोकांच्या अधिकाधिक गाठी – भेटी घेऊन वातावरण निर्मितीसाठी वेळ मिळणार आहे. त्यामुळे एकंदरीत नवख्या उमेदवारांमध्ये निवडणूका लांबल्याची बातमी ऐकताच समाधान व्यक्त केले जात आहे.