क्राईम
जिल्हा परिषदेचे आणखी दोन शिक्षक निलंबित सीईओ अजित पवारांचा दणका
बीड : आरोग्य विभाग पेपरी फुटी प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या दोन्ही शिक्षकांना दणका देत सीईओ अजित पवार यांनी आज निलंबित केले.
सहशिक्षक उद्धव प्रल्हाद नागरगोजे ( जि.प. प्रा. शा. कुक्कडगाव ता. बीड), सहशिक्षक विजय नागरगोजे ( जि.प.प्रा. शा. काकडहिरा ता. बीड ) या दोन्ही शिक्षकांचं आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी सहभागी असल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे सायबर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. यामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन झाली असा ठपका ठेवून आज सोमवारी दोन्ही शिक्षकांना बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी निलंबनाची कारवाई केली.