जिल्हा परिषद,न.प., ग्रा.पं. निवडणूका फेब्रुवारी पुर्वी होणार? निवडणूका आयोगाची तयारी सुरू
लोकगर्जनान्यूज
बीड : राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषदेमध्ये प्रशासक राज सुरू आहे. त्यामुळे निवडणूका कधी लागणार याकडे राजकीय पक्ष आणि इच्छुकांचे डोळे लागले आहेत. परंतु आताही प्रतिक्षा संपणार असे दिसत असून तीन टप्प्यात व फेब्रुवारी महिन्या पुर्वी निवडणूका घेण्याची तयारी आयोगाने सुरू केल्याचे वृत्त आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषदांची मुदत संपली असल्याने सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत. अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपली तर आणखी काही ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे. यापुर्वीच जि.प. न.प. ची निवडणूकीची तयारी सुरू झाली होती. यासाठी प्रभाग व गट,गणांची रचना झाली आहे. परंतु सत्ता बदला नंतर या निवडणूका पुढे ढकलून प्रशासक नेमण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर कधी होणार याची राजकीय पक्ष व इच्छुकांना प्रतीक्षा आहे. प्रतीक्षा संपण्याची चिन्हे दिसत असून, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात निवडणूक आयोग जि.प., न.प. व ग्रामपंचायत निवडणूका तीन टप्प्यात घेणार असल्याचे वृत्त आहे. यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली. फेब्रुवारी नंतर १०,१२ सह इतर परिक्षा असतात. यानंतर कडाक्याचे उन असतं यामुळे फेब्रुवारी महिन्या पर्यंत तीनही टप्पे होण्याची शक्यता आहे. यामुळे दिवाळी संपली की, निवडणूकांची रणधुमाळी सुरू होईल असे वाटते. प्रभाग व गट,गण संख्या कमी झाली तर आरक्षण बदलू शकतो जर या पुर्वीच्या रचनेनुसार संख्या राहिली तर आरक्षण कायम राहू शकतो पण याबाबत अद्याप काही चित्र स्पष्ट नाही. यासाठी मतदारांना वाट पहावी लागणार आहे.