जिल्हाभरात वसावीमाता जन्मोत्सव ढोलताशा व फटाक्यांच्या आतिषबाजीत उत्साहात साजरा

केज : आर्यवैश्य समाजाचे आराध्य असलेल्या कुलस्वामिनी वसावी माता अर्थातच कन्यकापरमेश्वरी देवीचा जन्मोत्सव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शोभायात्रा ढोलताशा व फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठया उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुमित रुद्रवार व सचिव वैभव झरकर यांनी दिली
केज येथे कुमारिका पाद्यपूजा , कुंकुमार्चन , पालखी व शोभायात्रा काढून वासवी मातेचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला केला. बीड येथील समाज बांधवांनी अतिशय छान डेकोरेशन कुंकुमार्चन व महिलांनी खूप छान असा दांडिया सादर केला. तसेच धारूर येथील समाज बांधवांनी वासवी मातेचे ग्रंथ पारायण, कुंकुमार्चन आणि महिलांनी वासवी मातेच्या गीतावर अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध असे नृत्य सादर केले व महाप्रसादाचे आयोजन केले. तसेच परळी येथील समाज बांधवांनी तीन दिवस पारायण करत भव्य आशा रथामध्ये मिरवणूक काढून शोभायात्रा काढली व महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केले होते. आंबेजोगाई येथील समाज बांधवांनी कुंकुमार्चन व महाआरती करत मातेचा जन्मोत्सव साजरा केला. तसेच माजलगाव येथे महिला मंडळांनी कुंकुमार्चन व ढोल-ताशांच्या गजरामध्ये अतिशय थाटामाटात जल्लोषात शोभायात्रा काढून जन्मोत्सव साजरा केला एकूणच बीड जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्तरावर कुलस्वामिनी वासवी मातेचा जन्मोत्सव साजरा केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष सुमित रुद्रवार व सचिव वैभव झरकर यांनी समाधान व्यक्त करत समाजबांधवांचे अभिनंदन करत आभार देखील मानले आहेत