जिल्हाधिकारी ( collector ) आज केज तालुक्यातील ‘या’ गावात; काय आहे विशेष?
लोकगर्जनान्यूज
केज : बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी ( collector ) मॅडम आज तालुक्यातील कळमअंबा येथे आयोजित सिताफळ कार्यशाळेला उपस्थित रहाणार आहेत. आडस रोडवर आईचा माळ ( रेणुका माता ) मंदिर परिसरात ही कार्यशाळा आयोजित केली. सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत हा कार्यक्रम असणार आहे.
सिताफळ बीड जिल्ह्याला निसर्गाची मोठी देणगी आहे. या जी आय सिताफळाचा बहार धरण्याचा हा काळ आहे. म्हत्वाची वेळ असल्याने उत्पादन वाढीसाठी नियोजन कसे करावे, चांगले मार्केट मिळावे, शासनाच्या योजना, मॅग्नेट कंपनीच्या योजना, उत्तम कृषी पद्धती -सिताफळ, सिताफळ प्रक्रिया उद्योगाच्या गरजा, मार्केटिंग या बाबतीत मार्गदर्शन व कार्यशाळा मानवलोक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आली. सदरील कार्यशाळेचे सकाळी १० वाजता उद्घाटन होईल. यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत कार्यक्रम राहील. यासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे या अध्यक्षस्थानी रहाणार आहेत. तसेच बीडचे कृषी अधिकारी, आत्माचे जिल्हा प्रमुख हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित रहाणार आहेत. या कार्यशाळेला तालुक्यातील सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.