लोकगर्जना न्यूज
आडस : किशोरवयीन वय हा वादळासारखे असून, या वयात आयुष्याचा सार आहे. त्यामुळे देशातील महापुरुषांचे आदर्श समोर ठेवून जनसेवेचा वसा सांभाळा असे प्रतिपादन प्रा. डॉ. हनुमंत सौदागर यांनी येथे आयोजित किशोरवयीन मुलांच्या मार्गदर्शन शिबिरात बोलताना केले.
केज तालुक्यातील आडस येथे रविवारी ( दि. २४ ) दुपारी येथील जीवनदिप कोचिंग क्लासेस मध्ये क्लासेस व लोककल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. हनुमंत सौदागर हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नितीन ठाकुर तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा केकाण, पत्रकार रामदास साबळे, सर्वोदय प्रतिष्ठानचे सागर पवार, शिवरुद्र आकुसकर, क्लासेसच्या दिप्ती पवार यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. सौदागर म्हणाले की, माणसाचा जन्म हा विशेष कारणासाठी झालं आहे. तो कारणं आहे समाजाचे आपण काही देणे लागतो? आपण मृत्यू नंतर आपल्या नातेवाईकांना विसरून जातो पण महा पुरुषांना विसरत नाही. यामागे त्यांचे सामाजिक कार्य असून त्यांनी समाजाच्या हितासाठी आपलं आयुष्य व्यतीत केले. यामुळे ते अमर ठरले आहेत. त्यांचंच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण ही समाजाच्या हितासाठी कार्य करण्याची गरज आहे. किशोरवयीन वय हे अनेक बदलांचा काळ आहे. यामध्ये अनेक गोष्टींचं आकर्षण असत. हा शरिरातील बदलाचा परिणाम आहे. परंतु या वयात आपण तोल सांभाळणं आवश्यक आहे. ज्याने तोल सांभाळत आपलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला तर त्याच यश कोणीही रोखू शकत नाही. अन् जर तोल ढासळला तरी तो नष्ट झाल्या शिवाय रहात नाही. तसेच पुस्तकी ज्ञानासह समाजात मिसळून व्यवहारीक ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. कौमार्य अवस्थेत काही अडचणी जाणवतं असतील तर त्याबाबत आपल्या पालकांना अथवा शिक्षकांना बोलायला हवं, सध्या मोबाईल प्रत्येकाच्या हातात आलं असून त्याचा चांगला उपयोग करावा असे आवाहन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा केकाण यांनी किशोरवयीन अवस्थेत शरीरातील होणारे बदल आणि सकस आहार घेण्या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार रामदास साबळे, शिवरुद्र आकुसकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता नितीन ठाकुर यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. कार्यक्रमाचे संचालन व आभार सुषमा आकुसकर यांनी मानले. यावेळी आशा कार्यकर्ती व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.