छञपती राजर्षी शाहू बँकेच्या केज शाखेचा चोविसावा वर्धापनदिन साजरा

नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्षांचा व्यापाऱ्यांच्या वतीने केला सत्कार
केज : शहरातील श्री. छञपती राजर्षी शाहू बँकेचा चोविसावा वर्धापनदिन व नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार सोहळा येथील व्यापाऱ्यांकडून करण्यात आलं.
अल्पावधीतच गरुडझेप घेतलेल्या श्री. छञपती राजर्षी शाहू बँकेच्या केज शाखेचा चोविसावा वर्धापनदिन बँकेच्या दालनात साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे होते.तसेच प्रमुख पाहुणे बँकेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष इंजी. अजय अर्जुनराव जाहेर पाटील,उपाध्यक्ष प्रा.नारायण नरहरी मस्के होते
यावेळी व्यापाऱ्यांनी सत्कार करून दोघांनाही शुभेच्छा दिल्या. यांचा सत्कार व्यापारी बांधवांच्या वतीने करण्यात आला.यावेळी बोलताना इंजि. अजय पाटील यांनी कार्यकारी संचालक मंडळाला बहुमताने निवडुन दिल्या बद्दल सभासदांचे आभार मानले. बँकेच्या प्रगतीसाठी कर्ज घेऊन त्याची नियमीतपणे फेड करावी तसेच बँकेने दिलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले . यानंतर उपाध्यक्ष प्रा. नारायण मस्के यांनीही मनोगत व्यक्त केले तर, कार्यक्रमाची सांगता अध्यक्षांच्या भाषणाने झाली. यावेळी प्रा.हनुमंत भोसले, स्थानिक सल्लागार रामचंद्र आनेराव, प्रकाश भन्साळी, बापुराव शिंगण, राहुल देशमुख , विनोद साखरे,भाई मोहन गुंड,बाळासाहेब गुंड,रामचंद्र जाधव,अॕड.श्रीमती अनिता मुंडे,अंकुशराव इंगळे,दिलीप गुळभिले,अॕड.सुधाकर अंबाड,अॕड.वसंतराव चिंचोलीकर अन्य व्यापारी व बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.यावेळी सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार रोटरी क्लब आॕफ केज यांच्या वतीने अध्यक्ष बापुराव शिंगण,सचिव अरुण अंजाण,विकास मिरगणे व प्रा.हनुमंत भोसले यांच्या वतीने करण्यात आला. प्रा.हनुमंत भोसले यांनी उपस्थीतांचे आभार मानले.