चौफेर विकास नमिता मुंदडा यांचा विजय सोपा करणार
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार या महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी मागील पाच वर्षात मतदारसंघाचा चौफेर विकास केला आहे. या विकास कामामुळे त्यांचा विजय सोपा होणार अशी खात्री मतदार व्यक्त करीत आहेत.
केज मतदारसंघात विकासाची दृष्टी असलेले राजकीय कुटुंब कोणतं असा प्रश्न उपस्थित केला तर ९५ टक्के लोक सरळ मुंदडा कुटुंबाचे नाव घेतात. केज मतदारसंघात विकास काय असतो हे जनतेने स्व. विमलताई मुंदडा या आमदार झाल्यानंतर अनुभवला आहे. त्यांच्या कार्यकाळात तलाव, रस्ते, वीज, पाणीपुरवठा योजना आदी कामे त्यांच्या कार्यकाळात लोकांनी पाहिले. त्यांच्याच काळात मतदारसंघातील गावांनी पक्के रस्ते पाहिले, त्या अगोदर लोकांना कच्च्या रस्त्यांनीच प्रवास करावा लागत होता. हाच विकासाचा आदर्श आणि वारसा आमदार नमिता मुंदडा यांनी पुढे चालविला आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी नमिता मुंदडा यांच्यावर विश्वास दाखवून प्रतिनिधी म्हणून निवडून देत विधानसभेत पाठविले होते. त्यांनीही हा विश्वास सार्थ ठरवित सुरवातीच्या अडीच वर्षांत सत्ता नसतानाही त्यांनी मतदारसंघात अनेक विकास कामांना मंजुरी मिळवून निधी खेचून आणला होता. अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले. यानंतर राज्यात सत्तांतर घडले अन् परत राज्यात महायुतीची सत्ता आली. या सत्तेच्या काळात पुन्हा कामांना गती आली. आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, नंदकिशोर मुंदडा यांनी प्रयत्न करीत हजारो कोटींचा निधी मंजूर करुन आणला यातून मतदारसंघाचा चौफेर विकास केला. ही विकास कामे लोकांच्या नजरेत असून, आज काहीजण मुंदडा कुटुंबा विषयी नकारात्मकता पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु या विकास कामामुळे विरोधकांचा हा प्रयत्न मात्र निशफळ ठरणार असे दिसून येत आहे.