क्राईम
चोरट्यांनी विद्युत मोटार लांबविली;नांदूरघाट येथील घटना
केज दि.२ – अज्ञात चोरट्यांनी विहिरीवरील १५ हजार रुपये किंमतीची विद्युत मोटार चोरून नेल्याची घटना केज तालुक्यातील नांदूरघाट शिवारात घडली.
नांदूरघाट येथील शेतकरी भगवान रामभाऊ खरात यांची शिवारातील गट नं. ४३ मध्ये जमीन आहे. त्यांच्या शेतातील विहिरीवरील १५ हजार रुपये किंमतीची पाच एचपीची विद्युत मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. शेतकरी भगवान खरात यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. जमादार गोविंद बडे तपास करत आहेत.