चोरट्यांनी नांगरच पळविला; केज तालुक्यातील घटना

केज : तालुक्यातील लाखा येथून ट्रॅक्टरच्या नांगर अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबतची माहिती अशी की, लाखा ता. केज येथील संजय नरहरी घाडगे यांचा सर्व्हे नंबर ३१(१), बोडखी नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात ठेवलेला जयकीसान कंपनीचा जुना ४५ एच. पी. ट्रॅक्टरचा नांगर ( दि.१७ )जानेवारी रात्री अज्ञात चोरट्यानी चोरून नेला आहे. त्यानी नांगराचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. म्हणून संजय नरहरी घाडगे यांनी ( दि. २८ ) तक्रार दिली. त्यावरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गु.र.नं. २३/२०२२ भा.दं.वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करीत आहेत. आजपर्यंत आपण अनेक वस्तू चोरीला गेल्याचे ऐकलं, पाहिले पण नांगर चोरी झाला हे प्रथमच ऐकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.