क्राईम

चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी: परिसरात भीतीचे वातावरण

लोकगर्जनान्यूज

बीड : ऐन दिवाळीत चोरट्यांनी एका घरात घुसून पती-पत्नीला मारहाण करुन ऐवज लुटून नेला असल्याची घटना मातोरी ( ता. शिरुर का. ) येथे आज पहाटे घडली आहे. या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर बीड येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

रमेश गायकवाड व अंजना गायकवाड रा. मातोरी ( ता. शिरुर कासार ) हे दोघे पती-पत्नी झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास तीन ते चार चोरटे घरात शिरले व ते घरातील साहित्याची नासधूस करु लागले. हा आवाज ऐकून गायकवाड दांपत्य जागे झाले असता त्यांनाही चोरट्यांनी मारहाण केली. घरातील ऐवज चोरुन नेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »