चोरट्यांचा सिगारेट व मसाल्यावर डल्ला…
केज : येथे किराणा आणि सिमेंट दुकानाचे शटर उचकटून रोख रक्कमसह सिगारेट पॉकेट व मसाला असे एकूण सुमारे ४४ हजार रु. चे साहित्य लंपास केले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
येथील बीड रोड लगतच्या लक्ष्मी नगर समोर परमेश्वर वैजेनाथ घुले यांचे यशवंत किराणा ॲन्ड जनरल स्टोअर्सचे अज्ञात चोरट्यानी कुलूप तोडून गल्ल्यातील १८ हजार रु. व दहा सिगारेट पाकिटे आणि मसाला पाकीट असे एकूण १९ हजार १५० रु. चा मुद्देमाल चोरून नेला. यानंतर याच रस्त्यावरील अनिल भोजनालय समोरील सुरेंद्र बाळासाहेब पत्की यांचे समर्थ ट्रेडर्स सिमेंट दुकानाचे लोखंडी शटर उचकटून दुकानात घुसून गल्ल्यातील रोख २५ हजार रु. चोरून नेले. या दोन्ही चोरीच्या घटनेत नगदी ४२ हजार रु व सिगारेट आणि मसाल्यासह एकूण ४४ हजार रु. ची चोरी झाली आहे. या प्रकरणी परमेश्वर वैजेनाथ घुले यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०९/२०२२ भा.दं.वि. ४५७ आणि ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तांदळे हे पुढील तपास करीत आहेत.