चेष्टा सहन न झाल्याने मित्रानेच काढला मित्राचा काटा
शेततलावात ढकलून जीव जाईपर्यंत बसला छातीवर
लोकगर्जनान्यूज
माजलगाव-प्रत्येकाला एक मित्र आसावा त्यांच्यासोबत मनमोकळ करता यावे, त्याच्यासोबत चेष्टा, मस्करी करत वेळ आनंदात घालवता यावा. परंतु कधीकधी हीच गोष्ट जिवावर बेतू शकते. हे त्याचे उत्तम उदाहरण तोतर बोलण्यावरून मित्राने चेष्टा केली. परंतु ती सहन न झाल्याने त्याने चक्क मित्राला शेत तलावात ढकलून देत त्याचा जीव जाईपर्यंत छातीवर बसून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याची घटना पवारवाडी ( ता. माजलगाव ) शिवारात मंगळवारी ( दि. २६ ) दुपारी घडली.
कुंडलिक ( श्रीपाद ) धुमाळ (वय २४ वर्ष ) रा. पवारवाडी असे मयताचे नाव असून तो दोन मित्रासोबत अशोक खामकर यांच्या शेतातील शेत तलावाजवळ बसला होता. यावेळी गावातीलच मित्र संभा उर्फ महेश उत्तमराव मोरे तेथे आला. यावेळी कुंडलिक धुमाळ याने संभा मोरे याला तोतरे बोलण्याच्या व्यंगावरून नेहमीप्रमाणे चिडविले . यावरून दोघात मोठा वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारी झाले तर, रागाच्या भरात चिडलेल्या संभा मोरे याने धुमाळला शेत तलावात ढकलून दिले. स्वतः त्याच्या छातीवर उडी मारली. श्वास कोंडेपर्यंत त्याला बुडवून ठेवले. या घटनेत धुमाळचा जीव निघून गेला. याप्रकरणी मयताचे वडील भीमराव साधू धुमाळ यांच्या फिर्यादीवरून संभा उर्फ महेश उत्तमराव मोरे याच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३०२ भादवी नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा पुढील तपास
पोलीस निरीक्षक बालक कोळी, सपोनि विजय
जानवले हे करत आहेत. चेष्टा सहन न झाल्यामुळे मित्राने मित्राचा काटा काढल्याची घटना समोर येताच माजलगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.