चेंगराचेंगरी पाठोपाठ आणखी एक मोठी घटना

नववर्षाच्या सुरुवातीलाच काळाचा घाला!
हरयाणा : भिवनी येथे दगड खाणीच्या कडा ढासळून त्याखाली दहा मजुर दबल्याची घटना समोर आली आहे. तसेच अनेक मशीन ही दबल्या आहेत. वैष्णोदेवी मंदिर चेंगराचेंगरी नंतर ही आणखी एक घटना समोर आल्यानंतर मन सुन्न झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
पहाटेच्या वेळी वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन १२ भाविकांचा मृत्यू तर २० च्या जवळपास जखमी झाल्याची घटना घडली. त्या पाठोपाठ हरयाणा मधून एक मोठी घटना समोर येत आहे. येथील भिवणी परिसरात दगडाच्या खाणीत अनेक कामगार काम करीत असताना कडा कोसळल्याने त्याखाली दहाहून अधिक मजुर दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातील तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. अजून मदतकार्य सुरू आहे. पर्यावरण विभागाच्या आदेशामुळे गेल्या दोन महिन्यांपासून खाण बंद होती. पुन्हा खोदकामास परवानगी दिली. शुक्रवार पासून खाणीत काम सुरू झाले आहे. आज ही घटना घडली. अनेक मोठमोठ्या मशीन ही दगडाखाली दबल्याने जीवितहानी सह आर्थिक नुकसान झाले आहे.