चुकून ऑनलाईन दुसऱ्या खात्यावर गेलेली रक्कम बीड सायबर विभागाने मिळवून दिली

लोकगर्जनान्यूज
बीड : तालुक्यातील एका शेतकऱ्याला मित्राच्या खात्यावर रक्कम पाठवायची होती परंतु चुकून ती दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर गेली. हताश झालेल्या या शेतकऱ्याने बीड सायबर पोलीसांशी ( Cyber Police Beed ) संपर्क साधून तक्रार केली. सायबर विभागाने तातडीने पावले उचलून शेतकऱ्याला रक्कम मिळवून दिली. संबंधित शेतकऱ्याने बीड पोलीसचे आभार व्यक्त केले.
बीड येथील सायबर पोलीस यांच्या प्रेस नोट नुसार तक्रारदार शेख शहाबाज करीम रा. हिंगणी हवेली ( ता. बीड ) हे शेतकरी आहेत. त्यांना मित्राला ऑनलाईन पैसे पाठवायचे होते. पैसे पाठवताना शहाबाज यांच्याकडून चुकीने दुसऱ्याच व्यक्तीच्या बॅंक खात्यावर गेले. यानंतर त्यांच्या समोर आता काय करायचं? हा प्रश्न निर्माण झाला. यानंतर त्यांनी सायबर विभागास तक्रार केली . तक्रार येताच बीड सायबर पोलीस ( Cyber Police Beed ) ठाणे यांनी तत्परतेने कार्यवाही करून, सबंधित खातेदार याचा शोध घेत उचित कारवाई करून तक्रारदाराचे पैसे परत मिळवून दिले. तक्रारदाराने या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त करत बीड पोलीस सायबर पोलीसांचे आभार मानले तर रक्कम परत मिळाल्याने समाधान व्यक्त केले.
तर याशिवाय अनोळखी कॉल, मेसेज जाहिरात जो तुम्हास काही लालुच दाखवत असतील तसेच येनकेन प्रकारे तुम्हास तुमचा एटीएम, क्रेडिट कार्ड, बँक अकाऊंट, UPI याची माहिती विचारत असेल, लॉटरी/ बक्षीसाचे आमिष दाखवत स्कीम, कर्ज देत असेलतर यास बळी पडू नये असे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केले आहे. असे काही प्रकार आढळून आल्यास अथवा घडल्यास तातडीने बीड सायबर पोलीसांकडे ( Cyber Police Beed ) तक्रार करण्याचे आवाहन केले.