चिंताजनक पब्जीने केला विद्यार्थ्याचा ‘गेम’: बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना
लोकगर्जनान्यूज
बीड : लहान थोरांच्या हाती स्मार्टफोन आले अन् त्यांचे अनेक तोटे फायदे समोर येऊ लागले. अनेकजण यामध्ये विविध गेम खेळतात. तरुण व तरुणाईच्या उंबरठ्यावर असणारे, लहान मुलांमध्ये पब्जी हा गेम सध्या खूप प्रसिद्ध आहे. याच पब्जीने एका १५ वर्षीय मुलाचा ‘गेम’ केल्याची धक्कादायक घटना आष्टी तालुक्यातून समोर आली. यामुळे पालकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
मोबाईल जिवन आवश्यक नाही परंतु आज विना मोबाईलचा कोणीही नाही. या मोबाईलमुळे अनेक फायदे होत आहेत. तसे नुकसानही आहेत. कोरोना काळापासून हा मोबाईल विद्यार्थ्यांच्या हाती गेल्याने तर मुलांना याचे वेड लागले आहे. प्रत्येकजण यामध्ये व्यस्त आहे. बऱ्याच मुलांना यातील ऑनलाईन पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या गेमचे व्यसन लागले आहे. प्रौढांचा विचार केला तर रमी खेळली जात आहे. यावर खूप रक्कम घालवत आहेत. विश्वास बसणार नाही काहींनी लाखो रुपये घालवून सध्या ते मानसिक ताणाचा सामना करत आहेत. लहान मुलं, तरुण व तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारे मुलं ऑनलाईन पद्धतीने चार-पाच जण मिळून पब्जी खेळतात. याच खेप जणांना व्यसन लागले आहे. याच पब्जीच्या नादा पायी बीड सांगवी ( ता. आष्टी ) येथील कृष्णा परमेश्वर साळवे ( वय १५ वर्ष ) याने आज शुक्रवारी ( दि. १६ ) सकाळी आई बाहेर जाताच घराची आतून कडी लावून आत्महत्या केली. आई घरी परत आल्यानंतर घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कृष्णा याने पब्जी गेम मुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती दिली. तसे वृत्त आहे. यामुळे विद्यार्थ्यांनो काय चांगलं,काय वाईट? याचा सारासार विचार करून मोबाईल गेम पासून दोन हात दुर रहा असे आवाहन करण्यात येत आहे.