चाईल्ड पॉर्न व्हिडिओ प्रसारित करणारा आरोपी पकडला; बीड सायबर सेलची कामगिरी
लोकगर्जना न्यूज
बीड : येथे मागील महिन्यात चाईल्ड पॉर्न व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे उघडकीस आले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी गंभीर दखल घेऊन बीड सायबर सेलच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपास करत अखेर या गुन्ह्याती आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बीड येथून बाल लैंगिक शोषणाचे ( चाईल्ड पॉर्न ) व्हिडिओ अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर प्रसारित केल्याची माहिती राज्य सायबर कडून बीड सायबर पोलीसांना मिळाली. या घटनेने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून बीड शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे ( दि. २७ ) जून २२ अज्ञात आरोपीच्या विरोधात गुरनं २५९/२०२२ कलम २९४ भादंवि सह कलम १३ ( ४ ) , १४ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधि सह ६७ , ६७ ( ब ) माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास बीड सायबर कडे वर्ग करण्यात आला. याचा मोठ्या शिताफीने तपास करुन आरोपी गोविंद बापुराव क्षीरसागर ( वय ३२ वर्ष ) रा. संत नामदेव नगर, धानोरा रोड बीड, या इंटरनेट कॅफे चालकाला मंगळवारी ( दि. २६ ) अटक केली. त्यास कोर्टा समोर हजर केले असता मा. कोर्टाने तीन दिवसांची पोलीस रिमांड मंजूर केली. सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड , पो. उपनि जाधव , पो.ह. भारत जायभाये , पो.ना. आसेफ शेख , अनिल डोंगरे , विजय घोडके , अन्वर शेख , पंचम वडमारे , संतोष म्हेत्रे , पो.ना. बप्पासाहेब दराडे , प्रदिपकुमार वायभट , महीला पोलीस अंमलदार सुनिता शिंदे , शुभांगी खरात सर्व सायबर पोलीस स्टेशन ब यांनी केली.