चर्चेतील त्या परीक्षेवर केज तालुक्यातील शिक्षकांचा बहिष्कार
लोकगर्जनान्यूज
केज : तालूक्यातील शिक्षक व सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येत सोमवारी होऊ घातलेल्या शिक्षक प्रेरणा परिक्षेवर बहिष्कार टाकत मा.गटविकास अधिकारी व मा.तहसिलदार साहेबांमार्फत प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.
शिक्षक हे सर्व शिक्षण पूर्ण करून नोकरी करतात सर्व परिक्षा दिल्यानंतरही आता जाचक परिक्षा कशासाठी असा संतप्त सवाल केज तालुक्यातील शिक्षकांची केला आहे. परिक्षेच्या ऐवजी शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धीगत करणे स्वयंअध्ययनाची गोडी लावणे स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रोत्साहीत करणे हे हेतू समोर ठेवून परिक्षा घेण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रशिक्षणातून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाठी प्रशासनाने वेगवेगळे उपकृम राबवावे अशे मत शिक्षकांनी व्यक्त केले
विद्यार्थ्यी हित लक्षात घेता प्रेरणा परिक्षेतून कुठलीही प्रेरणा मिळणार नाही या ऐवजी गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षण कार्यकृम राबवावा अशी ठाम भुमीका तालुक्यातील शिक्षकांनी मांडली आहे.