घरातून येत होती दुर्गंधी… पोलीसांनी दार उघडताच धक्कादायक द्रश्य दिसले
केज शहरातील फुलेनगर मधील घटना
केज : येथील एका घारातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी पोलीसांना माहिती दिली. घटनास्थळी येऊन पोलीसांनी दरवाजा उघडला असता समोर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तो सडल्याने दुर्गंधी सुटली होती. सदरील व्यक्ती एकटाच रहात असल्याने ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले असावं असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सुनील किसन हजारे असे मयताचे नाव असून, त्यांच पुर्ण कुटुंब बीड येथे रहात असल्याने ते एकटेच केज येथील महात्मा फुले नगरमध्ये रहात होते. आज शनिवारी ( दि. ११ ) परिसरातील नागरिकांना सुनील हजारे यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने याची नागरिकांनी पोलीसांना माहिती दिली. माहिती मिळताच एपीआय संतोष मिसळे यांनी पो. उपनिरीक्षक वैभव सारंग, पो. शमीम पाशा, अशोक नामदास यांना सोबत घेऊन घटनास्थळी भेट दिली. घराचा दरवाजा उघडताच त्यांना सुनील हजारे यांचा मृतदेह आढळला. त्याची दुर्गंधी पसरली होती. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा पण घरात कोणीच नसल्याने लक्षात आले नाही.