क्राईम
घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट एक ठार चार जखमी
लोकगर्जनान्यूज
परळी : घराला आग लागून घरगुती वापराच्या गॅस टाकीचा स्फोट होऊन एक मुलाचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना परळी शहरातील बरकत नगर मध्ये मंगळवारी ( दि. 9 ) रात्री 9 च्या सुमारास घडली आहे.
शेख आदिल उस्मान ( वय 14 वर्ष ) असे मयत मुलाचे नाव असून, शेख आवेज गौस आणि सय्यद शमशादबी हकीम व इतर दोन जखमींची नावं समजु शकले नाहीत. असे चारजण जखमी झाले. अचानक घराच्या बाजूला आग लागून ती घरापर्यंत आली. यामुळे घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आदिल या मुलाचा मृत्यू झाला. चारजण जखमी झाले आहेत. जखमीवर उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच रात्री घटनास्थळी पोलीस व अग्नीशमन दलाचे जवान दाखल झाले.