ग्रा.पं.गांजपूर पोट निवडणुकीत प्रा.ईश्वर मुंडे गटाच्या सौ.रूक्मीण पारवे विजयी

किल्ले धारूर : तालुक्यातील ग्रा.पं.गांजपूर चे सदस्य माणिक थोरात यांचे निधन झाल्यामुळे पद रिक्त झाले होते.त्या पदाच्या पोट निवडणुकीसाठी दि.२१/१२/२१ रोजी मतदान झाले होते.
या पोट निवडणुकीत सौ.रूक्मीण विठ्ठल पारवे विरूध्द आशोक मधुकर समुद्रे अशी दुरंगी लढत झाली होती
या मध्ये प्रा.ईश्वर मुंडे गटाच्या सौ.रूक्मीण विठ्ठल पारवे यांचा ६३ विरूध्द ७१ असा विजय झाला. या विजया नंतर गावात उमेदवाराची विजयी रॅली काढण्यात आली.
या वेळी बोलताना प्रा.ईश्वर मुंडे यांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन करून विजयासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या सर्व कार्यकरत्यांचे अभिनंदन करून मतदारांचे आभार मानले.
आगामी काळात गट तट विसरून गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेवून समाजकारण व राजकारण करणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी राहूल पारवे,महादेव मुंडे,रामकृष्ण सिरसट,दिलीप डापकर,केशव डापकर,संतोष पारवे,विठ्ठलराव पारवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीकृष्ण सिरसट यांनी सर्वांचे आभार मानले.
निवडणूक विना तक्रार शांततेत पार पडली.