ग्रामपंचायत निवडणूकीचा लवकरच बिगुल वाजणार? आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
लोकगर्जनान्यूज
बीड : मागील जवळपास सहा महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील 186 तर राज्यातील 2 हजार 216 ग्रामपंचायतीवर कार्यकाळ संपल्याने प्रशासक आहे. परंतु हे प्रशासक राज लवकरच संपुष्टात येऊन निवडणूकांचा बिगुल वाजणार असे चिन्ह दिसत आहे. निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असून पुढील आठवड्यात 21 तारखेला आरक्षण सोडत काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या तयारीत असलेल्या उमेदवारांमध्ये उत्साह संचारला जाईल.
जानेवारी 2023 ते डिसेंबर मध्ये कार्यकाळ संपलेल्या राज्यात 2 हजार 216 तर बीड जिल्ह्यातील 186 ग्रामपंचायत आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये सध्या प्रशासक राज असून यामुळे गावांच्या विकासाला खीळ बसली आहे. या ग्रामपंचायतीचे मागेच प्रभाग रचना झाली असल्याने प्रभाग आरक्षण सोडतीच्या कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे गावपातळीवर पुढारी व ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले होते. अखेर आज राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. पुढील आठवड्यात ( दि. 21 ) आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी 16 जूनला विशेष ग्रामसेची सूचना, 21 जूनला ग्रामसभेत आरक्षण सोडत, 22 जून प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करणे, 23 ते 30 जून हरकती, सूचना दाखल करणे, 6 जुलै हरकतींवर उप विभागीय अधिकारी यांचे अभिप्राय नोंदवने तर 7 जुलै जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचना काढतील याप्रमाणे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. प्रभाग रचना, आरक्षण सोडत पहाता ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या लवकर बिगुल वाजणार असे दिसून येतं आहे.