क्रीडा

गौरवास्पद! जिल्ह्यातील बॉडी बिल्डरने बीडची मान देशात उंचावली

माजलगाव येथील बागवानने बॉडी बिल्डिंग स्पर्धेत देशात ५ क्रमांक पटकावला

लोकगर्जनान्यूज

बीड : जिल्ह्यातील माजलगाव येथील बॉडी बिल्डर हाफेज माजेद बागवान याने पंजाब येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत देशातून पाचवा क्रमांक पटकावून देशात बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करुन माय भूमीत परतताच जंगी स्वागत करण्यात आले.

सामान्य कुटुंबातील हाफेज माजेद बागवान हा माजलगाव येथे रस्त्यावर गाडा लावून फळ विक्रीचा पारंपरिक व्यवसाय करतो. यासोबतच त्याला बॉडी बिल्डिंगचा छंद आहे. सकाळी-संध्याकाळी वेळ काढून शरीर पिळदार केले. स्वतःसह माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील स्टार हेल्थ क्लब या जिममध्ये ट्रेनिंग देण्याचं काम करतो.दरम्यान लुधियाना ( पंजाब ) येथे सिनियर बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धेसाठी प्रथमच निवड झाली. सदरील स्पर्धा दि. २३ ते २५ डिसेंबर असे तीन दिवस पार पडली. या स्पर्धेत बागवान यांनी ६५ किलो वजन गटात आपल्या पिळदार शरीराचं प्रदर्शन करुन देशातून पाचवा क्रमांक पटकावला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील एका सामान्य तरुणाने मिळवलेले यश हे अ साधारण असून, मेहनत घेणाऱ्यांसाठी कोणीही रोखू शकत नाही हे दाखवून दिले. बीड जिल्हा हा क्रिडा क्षेत्रात मागे नाही हे अविनाश साबळे, सईद चाऊस, राहुल आवारे, बॉडी बिल्डर हाफेज माजेद बागवान यांनी सिद्ध केले. स्पर्धा जिंकून माजलगाव येथे येताच मित्र, बॉडी बिल्डिंग प्रेमी तरुणांनी बागवान यांचे जंगी स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »