गोड बातमीचा काउनडाऊन सुरू: उद्या बारावी HSC निकाल
लोकगर्जनान्यूज
बीड : परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांना प्रतिक्षा असते निकालाची ती आता संपली असून, गोड बातमीचा काउनडाऊन सुरू झाला आहे. उद्या गुरुवारी दुपारी २ वाजता बारावी HSC चा ऑनलाईन निकाल घोषित होणार आहे.
इयत्ता १२ बोर्डच्या HSC परीक्षा काळात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी १०,१२ उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्यात आला होता. यामुळे याचा परिणाम होऊन निकाल उशिरा लागणार असे अंदाज बांधले जात होते. तर परीक्षा संपून जवळपास दोन महिने संपले आहेत. तरीही बोर्डाने निकालाची तारीख घोषित केली नसल्याने उशिरच लागणार म्हणून बारावीचे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते. परंतु बोर्डाने विद्यार्थ्यांची उत्सुकता ताणून न धरता आज अखेर निकालाची तारीख व वेळ घोषित केली. इयत्ता १२ चा ऑनलाईन निकाल उद्या गुरुवारी ( दि. २५ ) दुपारी २ वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल mahresult.nic.in विद्यार्थ्यांना पहाता येणार आहे.