गेवराई येथील बालकाचा मृतदेह सापडला
लोकगर्जना न्यूज
गेवराई : येथील तीन वर्षांचा बालक नाल्यात पडून वाहून गेल्याची घटना सोमवारी घडली. काल पासून त्याचा शोध घेण्यात येत होता. अखेर अनेक प्रयत्नानंतर बालकाचा दत्तनगरी पार्क जवळील पुलाजवळ मृतदेह सापडला आहे. यामुळे गेवराई प्रशासन व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
बंटी ज्ञानेश्वर क्षीरसागर ( वय ३ वर्ष ) हा बालक काल सोमवारी बालवाडीतून घरी परतताना तो नाल्यात पडून विद्रुपा नदीत वाहून गेला. काल पासून त्याचा नदी पात्रात शोध घेण्यात येत होता. परंतु तो सापडत नसल्याने गेवराई करांचे याकडेच लक्ष लागले होते. आज अनेकजण शोध कार्यात सहभागी होऊन विद्रुपा नदी पात्रात उतरून शोध घेत होते. या शोध कार्याला यश आले असून काही वेळापूर्वी बंटी क्षीरसागर या बालकाचा दत्तनगरी पार्क जवळील पुलाजवळ मृतदेह सापडला आहे. शोध कार्य थांबले आहे. गेवराई तालुका प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.