गेवराई जवळ अपघातात माजलगावातील भाजपा नेत्याचा पुतण्या ठार: या अपघातामुळे सिट बेल्ट ( Seat Belt ) चे महत्व समजले
लोकगर्जनान्यूज
गेवराई : औरंगाबाद येथून माजलगावकडे येताना भाजपा नेते मोहनराव जगताप यांच्या पुतण्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( दि. १३ ) रात्री १२ च्या सुमारास गेवराई जवळ घडली. यामध्ये एकजण जखमी असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताने सिट बेल्ट ( Seat Belt ) किती म्हत्वाचा आहे हे समजले असून ज्या व्यक्तीने सिट बेल्ट ( Seat Belt ) लावला होता ते बचावले असून ज्यांनी सिट बेल्ट ( Seat Belt ) लावलं नाही त्या युवकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, माजलगाव येथील भाजपा नेते मोहनराव जगताप यांचा पुतण्या विश्वजीत जीवनराव जगताप ( वय २२ वर्ष ) हे औरंगाबाद येथे गेले होते. तेथून माजलगावकडे परतताना गेवराई जवळ आले असता विश्वजीत जगताप यांचे वाहनाची एका कंटेनरला पाठीमागून धडक बसून घडलेल्या अपघातात डोक्याला गंभीर इजा होऊन विश्वजीत जगताप यांचा मृत्यू झाला. ते स्वतः वाहन चालवत होते असे सांगितले जात आहे. तर बाजुच्या सिटवर बसलेले आर्यन कंटुले हे जखमी झाले आहेत. या अपघातात प्रत्येक वाहन धारकांनी एक धडा घ्यावा अशी माहिती समोर आली असून, विश्वजीत जगताप हे वाहन चालवताना सिट बेल्ट ( Seat Belt ) लावलेलं नव्हतं त्यामुळे डोक्याला मार लागला व यामुळे जीव गमावला तर बाजुच्या सिटवर बसलेले आर्यन यांनी सिट बेल्ट ( Seat Belt ) लावलेलं असल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. यातून सिट बेल्टचे महत्व पटले असून, प्रत्येकाने प्रवासात सिट बेल्ट अनिवार्य समजून लावावे असे आवाहन करण्यात येत आहे.