गुटखा व ६ लाख रोख रक्कम असलेली कार पकडली

लोकगर्जना न्यूज
बीड : शहरा जवळ इरटिगा कारची झडती घेतली असता त्यामध्ये साडेपाच लाखांचा गुटखा व रोख ६ लाख सह कार व दोन मोबाईल असा एकूण १६ लाख ८५ हजार ७५० रु. मुद्देमालासह दोघे ताब्यात घेतले. सदरील कारवाई पहाटे ३:३० च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा कुर्ला रोडवर एकजण विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून दोन पथके बनवून सदरील ठिकाणी सापळा लावण्यात आला. पहाटे ३:३० च्या सुमारास इरटिगा क्रमांक एम.एच. २४ ए एस ३४८२ ही कार आली. पोलीसांनी त्यास थांबण्यास सांगितले कारची झडती घेतली असता त्यामध्ये हिरा गुटखा १९ गोण्या व मिक्स करण्याची पत्ती १९ गोण्या असे ५ लाख ५० हजारांचा गुटखा, रोख ६ लाख, कार ५ लाख, दोन मोबाईल असा एकूण १६ लाख ८५ हजार ७५० रु. मुद्देमाल जप्त केला. तसेच परशुराम मोहन गायकवाड, गोविंद नवनाथ खांडे या दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.