गुगल-पे वर चुकून आले ३० हजार रुपये …. तरुण शेतकऱ्याने काय केले….?
केज : अनेक वेळा आपण ऐकतोत की, माणसं प्रामाणिक राहिले नाहीत. नात्या गोत्यात आणि व्यवहारात सुद्धा प्रामाणिकपणा बुडत चाललाय. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडतात आणि त्याचा अनुभव देखील येतो. परंतु आणखी बरेचजण त्याला अपवाद आहेत. ज्यांच्यावर आईवडील आणि गुरुजनांचे चांगले संस्कार झालेले आहेत. असे ‘शुद्ध बिजा पोटी; फळे रसाळ गोमटी’ या उक्ती प्रमाणे प्रचिती येते.
केज तालुक्यातील रमेश (आण्णा) इंगळे हे शेती करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागविणारा एक सामान्य तरुण शेतकरी. त्यांच्या बँक खात्यावर अचानक एके दिवशी ३० हजार रु. गुगल-पे द्वारे जमा झाले. हे ३० हजार रु. जमा झाल्याचा संदेश रमेश (आण्णा) इंगळे यांना त्यांच्या मोबाईल आला. रमेश इंगळे यांनी तात्काळ हे पैसे कुठुन आणि कसे जमा झाले? याची सविस्तर माहिती घेतली असता; साळेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रीय मुख्याद्यापक एस. टी. काळे सर यांच्या खात्या वरून गुगल-पे द्वारे जमा झाल्याचे समजले. रमेश इंगळे यांनी तात्काळ ही माहिती काळे सरांचे सहकारी ज्ञानेश्वर इंगळे यांना दिली आणि सांगितले की, चुकून काळे सरांचे ३० हजार रु. माझ्या खात्यावर जमा झाले आहेत. ते पैसे त्यांना परत करायचे आहेत. नंतर ज्ञानेश्वर इंगळे यांनी रमेश (आण्णा) इंगळे व काळे सरांचा एकमेकांशी संपर्क साधून दिला व त्या दोघांचे बोलणे करून दिले. नजरचुकीने आलेले ३० हजार रु.रमेश (आण्णा) इंगळे यांनी परत एस. टी. काळे सरांना पाठवून दिले.
या प्रकारामुळे रमेश (आण्णा) इंगळे यांचे त्यांचे मित्र बलभीम बचुटे, रवींद्र जोगदंड आणि अनेकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. म्हणून अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे रमेश (आण्णा) इंगळे हे ढळढळीत उदाहरण आहे.
—————————————————-
” मला हे ३० हजार रु. ज्ञानेश्वर (आण्णा) इंगळे यांना गुगल-पे द्वारे पाठवायचे होते. परंतु अनावधानाने ते पैसे माझ्याकडून रमेश (आण्णा) इंगळे यांच्या खात्यावर जमा झाले. परंतु ते त्यांनी प्रमाणिकपणे वापस केले. त्या बद्दल त्यांचे अभिनंदन .
—- एस. टी. काळे
————————————————-
“परक्याचे आणि लबाडीने आलेले धन कधीच पचत नाही. अशी मला माझे आई-वडील आणि गुरुजनांनी शिकवण दिली. त्यामुळे मला त्या ३० हजार रु. चा मोह वाटला नाही.”
— रमेश (आण्णा) इंगळे, साळेगाव