आपला जिल्हाराजकारण

गाव कारभारी होण्यासाठी २४हजार ७७ इच्छुक; काल शेवटच्या दिवशी अनेकांनी भरले अर्ज

लोकगर्जनान्यूज

बीड : जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, शुक्रवार ( दि. २ ) हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्ह्यातील ११ तालुक्यातील ७०४ गावांचा कारभारी होण्यासाठी सरपंच पदासाठी ४ हजार २१६ तर सदस्य पदासाठी १९ हजार ८६१ असे एकूण २४ हजार ७७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांना जत्रेचे स्वरूप आले.

विरोधकांना चकवा देण्यासाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसाचा मुहूर्त ठरवला होता. यामुळे तहसील कार्यालयात मोठी गर्दी पहाण्यास मिळाली. अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवसभर ठाण मांडून बसने भाग पडले. मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज आल्याने रात्री उशिरापर्यंत आकडेमोड सुरू होती. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर काळात जिल्ह्यातील ११ खालील प्रमाणे ग्रामपंचायत व उमेदवारी अर्जांची संख्या
तालुका ग्रा.पं. सरपंच सदस्य एकूण
बीड १३२ ७२२. ३४०४. ४१२६
आष्टी १०९ ७४२. ३२७३. ४०१५
पाटोदा ३४. २२०. ९३७. ११५७
शिरुर का. २४. १६४. ७८५. ‌ ९४९
गेवराई ७६. ४७२. २३८२. २८५४
माजलगाव ४४. २४८. ११९१. १४३९
वडवणी २५. १६०. ७२९. ८८९
धारुर ३१. १६७. ‌ ७५८. ९२५
केज ६६ ३५७. १८०३.२१६०
अंबाजोगाई ८३ ४१७. २१८१ २५९८
परळी ८०. ५४७. २४१८ २९६५ ग्रामपंचायत ७०४, सरपंच ४२१६, सदस्य १९८६१, एकूण उमेदवारी अर्ज २४०७७ या प्रमाणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »