आपला जिल्हा

गावात उजेडासाठी आणलेली सिंगल फेज योजनाच अंधाराचे कारण ठरु लागली

लोकगर्जनान्यूज

केज : गावातील अंधार दूर करण्यासाठी आणलेली सिंगल फेज योजनाच गावातील अंधाराला कारणीभूत ठरत आहे. सिंगल फेज रोहित्राची क्षमता कमी असल्याने ते सतत जळत आहेत. झाल्यानंतर ते लवकरही मिळत नसल्याने सिंगल फेज योजनाच अंधाराचे कारण ठरु लागली असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.

काही वर्षांपूर्वी गावात १२ तास भारनियमन असल्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भाग अंधारात बुडत असे. हे चित्र बदलण्यासाठी महावितरण कंपनीने गावातील अंधार दूर करण्यासाठी सिंगल फेज योजना आणली, ती अनेक गावांसाठी वरदान ठरली आहे. परंतु आडससाठी डोके दुखी, गाव मोठं असल्याने सिंगल फेज चे रोहित्रांची क्षमता कमी पडत आहे. यामुळे सतत रोहित्र जळत आहेत. भारनियमन बंद करण्यासाठी आलेली सिंगल फेज योजनेमुळे आडस येथे भारनियमन करावं लागतं आहे. दररोज पहाटे ५ ते सकाळी ८ असे तीन तास भारनियमन सुरू आहे. तरीही रोहित्र जळण्याचे प्रकार सुरू आहेत. सध्याही दवाखाना डीपीचे १, वयराट डीपी १, हनुमान मंदिर २, सोनवळा रस्ताही १ असे चार ठिकाचे एकूण ५ रोहित्र जळालेले असून, पर्यायी व्यवस्था म्हणून तीन फेजचा भार दोन रोहित्रांवर टाकण्यात आला. यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा मिळत असल्याने पाण्याचे बोअर, पंखे, कुलर, फ्रिज हे सर्व विद्युत उपकरणे बंद आहेत. वीजेअभावी कोणतंच उपकरण चालत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. रोहित्र मिळत नसेल तर सिंगल फेज योजना आणलीच कशाला? असा प्रश्न विद्युत ग्राहक विचारत आहेत. हीच अवस्था तालुक्यातील सिंगल फेज रोहित्र असलेल्या प्रत्येक गावाची आहे. नेहमीच सिंगल फेज रोहित्रांचा तुटवडा असतो तरीही महावितरण कंपनी या रोहित्रांची संख्या नेमकी वाढवणार तरी कधी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »