आपला जिल्हाराजकारण

गावगाडा; सेवा सहकारी सोसायटी निवडणूकांत प्रथमच गाव पुढाऱ्यांची धावाधाव

अविरोध पार पडणाऱ्या निवडणूका यावेळी ठरल्या अटीतटीच्या लढती

 

लोकगर्जना न्यूज

मागील दहा पंधरा वर्षांपूर्वी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूका कधी होऊन जायच्या कोणालाही समजत नव्हते. निवड झाल्यानंतर चेअरमन, संचालक सभासदांना समजत असे. परंतु यावेळी गावागावात सोसायटीच्या निवडणूका होत आहेत. तेही अटीतटीच्या लढती ठरत आहेत. तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणूकी प्रमाणे बकरे, कोंबडे ही कापावे लागले. या झालेल्या बदलामुळे प्रथमच सोसायटीसाठी गाव पुढाऱ्यांची धावाधाव झाल्याचं दिसून आले. हा बदल सभासदांच्या जागरुकते मुळे घडला की, आपणही चेअरमन व्हावे या महत्वकांक्षेमुळे याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

सेवा सहकारी सोसायटी ही गावातील एक म्हत्वाची संस्था आहे. सोसायटीच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना पीककर्ज, इतर काही मदत करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बाजू बळकट करणारी संस्था म्हणून सोसायटीकडे पाहिले जाते. गावगाड्यामध्ये या संस्थेच्या चेअरमनना म्हत्वाचे स्थान आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या तुलनेत सेवा सहकारी सोसायटीला दुय्यम स्थान होते. सोसायटी कोणाला समजत नव्हती की, गाव पुढारी समजु देत नव्हते हा शोधाचा भाग आहे. सभासदांचे लक्ष नसल्याने चेअरमन, पुढारी हे गुपचूप सोसायटीच्या निवडणूका घ्यायचे व अविरोध आली म्हणून टिमकी वाजवायचे. सभासद, शेतकऱ्यांना चेअरमन,व्हा.चेअरमनची निवड झाली की, सोसायटीची निवडणूक झाली हे समजायचं. पण यावर्षी जिल्ह्यात बहुतांश गावात सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूका होत आहेत. त्याही अटीतटीच्या लढती ठरत असून, कधी नव्हे ते मतदारांना चपटी, बोटीच्या पार्ट्या देण्यात आल्या आहेत. बाहेर गावी रहात असलेल्या सभासदांना वाहन पाठवून मतदानासाठी आणण्यात आले. यासह इतरही खर्च पहाता यंदा सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत चेअरमनचा खिसा रिकामा झाला. अटीतटीची लढत होत असल्याने धावाधाव करावी लागली आहे. आपल्या जवळची माणसं सभासद करुन वर्षानुवर्षे वर्चस्व कायम ठेवणाऱ्या सोसायटी चेअरमनला प्रथमच घाम फुटलेला दिसून आलं. पुढे ही आता निवडणूका आणखी प्रतिष्ठेच्या होतील असे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »