क्राईम

गांजा घेऊन जाणारी स्कॉर्पिओ आडसमध्ये पकडली; आरोपी धारुर, माजलगाव तालुक्यातील

लोकगर्जनान्यूज

आडस : गांजा घेऊन आडस मार्गे धारुरच्या दिशेने जाणारी एक स्कॉर्पिओ पोलीसांनी आडस शिवारातील निसर्ग धाब्याजवळ थांबवून झडती घेतली असता आतमध्ये विनापरवाना गांजा घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलीसांनी गांजासह स्कॉर्पिओ, मोबाईल व रोख रक्कम असे एकूण जवळपास 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील तीन महिला व दोन पुरुषांना अटक करण्यात आली असून सदरील आरोपी धारुर, माजगाव अन् पाथरी ( जि. परभणी ) येथील आहेत.

पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे सुरू असतील अन् त्यावर त्यावर आम्ही कारवाई केली तर संबंधित पोलीस ठाणे प्रमुखावर कारवाई करण्याचा इशारा दिला. यानंतर सर्व पोलीस ठाणे प्रमुख ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. यांचे उदाहरण धारुर पोलीसांनी केलेली कारवाई आहे. एका स्कॉर्पिओ मध्ये आडस मार्गे गांजा नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. माहिती मिळताच आयपीएस ( IPS ) कमलेश मीना यांनी पथकासह अंबाजोगाई येथून पाठलाग सुरू केला. समोरुन धारुर पोलीसांनी येऊन आडस शिवारात निसर्ग धाब्याजवळ संशयित स्कॉर्पिओ थांबवून झडती घेतली असता आतमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना 117 किलो 710 ग्राम गांजा मिळून आला. स्कॉर्पिओ मधील तीन महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेतले. यावेळी गांजा किंमत 11 लाख 77 हजार 100रु., स्कॉर्पिओ क्र. MH 23 Y 0714 , 5 लाख, दोन मोबाईल 5 हजार, रोख रक्कम 420 असे एकूण 16 लाख 82 हजार 520 रू. मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी विलास परसराम गायकवाड ( वय 23 वर्ष ) रा. मंगरुळ क्र. 1 ता. माजलगाव, शिवाजी सिताराम फड ( वय 42 वर्ष ) रा. चौंडी ता. धारुर, गंगाबाई पांढुरंग चव्हाण ( वय 50 वर्ष ) रा. सावरगाव ता. माजलगाव, शांताबाई दत्ता मोहिते ( वय 38 वर्ष ) रा. पाथरगव्हाण ता. पाथरी ( जि. परभणी ), निर्मला दत्ता मोहिते ( वय 24 वर्ष ) रा. गांवदरा ता. धारुर यांच्यावर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई केज उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस कमलेश मीना, एपीआय देविदास वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद बासटे, आडस चौकीचे प्रशांत मस्के, जमीर शेख, विकास चोपणे, अश्फाक इनामदार, नाना निंगुळे, श्रीमती दीक्षा चक्के, तुकाराम चांदणे, परमेश्वर वखरे, नितीन काळे, धम्मानंद गायसमुद्र, मुकेश खरटमोल, मल्लिकार्जुन माने यांनी सदरील कारवाई केली.
बऱ्याच दिवसानंतर मोठी कारवाई
धारुर पोलीस ठाणे हद्दीतील व आडस येथे बऱ्याच दिवसानंतर मोठी कारवाई करण्यात आली. असेच जर पोलीस प्रशासन सजग राहिले तर अवैध धंद्याचा बीमोड होण्यास काहीच वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करत जनतेतून या कारवाईबाबत कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »