गरुजी कोणती प्रेरणा घ्यावी? केज तालुक्यात 8 तर बीड जिल्ह्यातून 600 शिक्षकांनी परीक्षा दिली
लोकगर्जनान्यूज
बीड : आज रविवारी ( दि. 30 ) सर्व जिल्हापरिषद व अनुदानित शाळेच्या शिक्षकांसाठी प्रेरणा परीक्षा होती. परंतु या परीक्षेला शिक्षकांचा विरोध आहे.संघटनांनी यावर बहिष्कार टाकला होता. यामुळे जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर शुकशुकाट होता. तर केज तालुक्यातील केवळ 8 तर जिल्हाभरात 604 शिक्षकांनी प्रेरणा परीक्षा दिली. यापेक्षा गुणवत्ता वाढीकडे लक्ष देऊन इतर पर्याय सांगत शिक्षकांनी या परीक्षेला विरोध केला. शिक्षकांचे म्हणणे अनुभवातून असलेतरी परीक्षेला विरोध जनतेला, पालकांना पटलेला दिसत नसून गुरुजी कडून नेमकी विद्यार्थी व समाजाने कोणती प्रेरणा घ्यावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शासनाकडून जिल्हा परिषद व शासकीय अनुदानित शाळेच्या शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षा ऐच्छिक होती. ऐच्छिक असूनही सुरवाती पासूनच याला शिक्षक संघटनांचा विरोध होता. या परीक्षेवर अनेक ठिकाणी सामुहिक बहिष्कार टाकण्यात आला. ऐच्छिक परीक्षा असल्याने यामध्ये यश-अपयशाचा अथवा कारवाईची शक्यता नसणार. मग शिक्षक संघटनांचा प्रेरणा परीक्षेला विरोध का? असाही प्रश्न सामान्य जनता उपस्थित करत आहे. हा शिक्षक संघटनांचा बहिष्कार यशस्वी झाल्याचा परीक्षा केंद्रावरील शुकशुकाटावरुन दिसून आला. बीड जिल्ह्यात एकूण 16 हजार शिक्षकांपैकी 7 हजार 717 शिक्षकांनी परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती. परंतु विरोध वाढत गेला आणि परीक्षा देणाऱ्या शिक्षकांची संख्या घटली. जिल्हाभरात 26 परीक्षा केंद्रावर 604 शिक्षकांनी परीक्षा दिली. यामुळे अनेक केंद्रांवर फक्त पर्यवेक्षक उपस्थित होते. केज तालुक्यातील 1 हजार 138 शिक्षकांपैकी पहिला पेपर 8 तर दुसरा पेपर 7 शिक्षकांनी दिला. येथे 5 परीक्षा केंद्राचे नियोजन होते. या परीक्षा बाबतीत फायदा नुकसान शिक्षकांना माहिती परंतु परीक्षेला विरोध का? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. याची चर्चा विद्यार्थ्यांपर्यंत गेली असून त्यांनी नेमकी गुरुजी कडून परीक्षा देण्याची की, विरोध करण्याची प्रेरणा घ्यावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिक्षकांचे याबाबत मत काय?
प्रेरणा परिक्षेच्या ऐवजी शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धीगत करणे स्वयंअध्ययनाची गोडी लावणे स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रोत्साहीत करणे हे हेतू समोर ठेवून परिक्षा घेण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रशिक्षणातून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाठी प्रशासनाने वेगवेगळे उपकृम राबवावे अशे मत शिक्षकांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यी हित लक्षात घेता प्रेरणा परिक्षेतून कुठलीही प्रेरणा मिळणार नाही या ऐवजी गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षण कार्यकृम राबवावा अशी ठाम भुमीका तालुक्यातील शिक्षकांनी घेतली होती. केवळ आठ शिक्षकांनी परीक्षेचा पहिला पेपर तर सात शिक्षकांनी दुसरा व तिसरा पेपर दिला दिला अशी माहिती गटशिक्षणाधिकारी श्री खरात,सुनील केंद्रे यांनी दिली.