गरीब, होतकरू विद्यार्थिनींना सायकलचे वाटप शिक्षकांच्या मार्गदर्शन प्रमाणे वाटचाल केल्यास यशाचं शिखर गाठणे शक्य- राजेश पाटील
केज : वाहनांची सोय नसल्याने पायी चालत शाळेत येणाऱ्या साळेगाव ( ता. केज ) शंकर विद्यालयातील विद्यार्थीनींना बीडच्या कुटे ग्रुपच्या वतीने सायकल वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रविण देशमुख तर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,दत्तात्रय धस, पत्रकार गौतम बजुटे, याची प्रमुख उपस्थिती होती. वाहनांची सोय नाही. परिस्थिती बेताची असल्याने सायकल घेऊ शकत नाही. शिकायचं तर आहे मग पायी चालत शाळेत जाण्या शिवाय पर्याय नाही. अशा विद्यार्थीनींना जेष्ठ पत्रकार वाघीरकर अविनाश यांच्या सहकार्याने बीडच्या कुटे फाऊंडेशन कडून सहा सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मेहनत करण्याची तयारी, जिद्द, चिकाटी सोबत शिक्षकांच्या मार्गदर्शन प्रमाणे वाटचाल सुरू ठेवल्यास यशाचं शिखर गाठणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले. संचालन राजकुमार गित्ते तर, आभार प्रताप केंदे यांनी मानले. किशोर म्हेत्रे, गोविंद म्हत्रे, तांबारे शहाजी, गालफाडे सचिन, मोटे रामेश्वर, घोडके सुरेंद्र, अकबर पटेल यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.