गंगा माऊली शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र – सौ. रजनीताई पाटील
तिसऱ्या ऊस गळापाचा झाला शुभारंभ
लोकगर्जनान्यूज
केज : गंगा माऊली शुगर ने या भागातील शेतकऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा व ऊस तोडणी लेबरचा विश्वास संपादन केला असून या विश्वासाच्याच जोरावर आगामी काळात देखील हा कारखाना काम करेल व शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना म्हणून पुढे येईल. अस मत गंगा माऊली शुगर च्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ खा.सौ.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक पाटील कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी सौ.रजनीताई पाटील बोलत होत्या.
गंगा माऊली शुगर च्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ दि.१३ नोव्हेंबर रोजी झाला यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा कारखान्याच्या संस्थापक संचालक सौ. रजनीताई पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना रजनी पाटील यांनी कारखान्याच्या प्रगती बाबत वाढत असलेला चढता आलेख याबाबत माहिती दिली. लक्ष्मणराव मोरे हे अतिशय उत्कृष्टपणे हा कारखाना चालवत आहेत त्यामुळे आमचे जे स्वप्न होत ते आता खऱ्या अर्थाने पुर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री अशोक पाटील यांनी देखील बोलताना सांगितले की, या कारखान्याशी आमची नाळ जुळलेली आहे म्हणून आम्ही हा चालवण्यासाठी योग्य चालक शोधत होतोत तो आम्हाला मिळाला व आता सर्व काही व्यवस्थित सुरू झालं. ज्ञानेश्वर माऊली यांचे आशिर्वाद कायमच आमच्या सोबत राहिले आहेत त्यामुळे आपण आता कारखान्याच्या बाबतीत समाधानी असून येणाऱ्या काळात देखील कारखाना आपल्या सर्वांना योग्य पद्धतीने दर देईल व आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांनी हा कारखाना या भागातल्या ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी व ऊस तोडणी कामगार, वाहतूक यंत्रणा यांच्या हक्काचा असल्याचे सांगितले येणाऱ्या हंगामात आपण वीज निर्मिती व CNG निर्मिती देखील सुरू करणार आहोत त्यामुळे या कारखान्याकडून ऊसाला देखील चांगला दर आम्ही देणार असून यापूर्वी देखील उसाच्या दरात आम्ही चढता भाव दिला असून साखर उद्योगात आम्हाला यश असून तुमचा आनंद हेच आमचा नफा असल्याचे मोरे यांनी सांगितले. अशा मोजक्या शब्दात त्यांनी आपले मत मांडले. यावेळी माजी मंत्री अशोक पाटील, कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे, नवनाथ थोटे, हभप आणासाहेब बोधले महाराज, हभप उद्धव बापू आपेगावकर, राहुल सोनवणे, बाबाराजे देशमुख, आपासाहेब ईखे, प्रकाश भन्साळी, हनुमंत मोरे, प्रविण मोरे, अविनाश मोरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक मुजावर, मुख्य शेतकरी अधिकारी अविनाश आदनाक यांचेसह सर्व संचालक, शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.