राजकारण

खोडस, वाघोली सेवा सहकारी सोसायटीवर आडसकर गटाचे वर्चस्व कायम

 

आडस : धारुर तालुक्यातील खोडस, वाघोली ग्रुप सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्व. बाबुरावजी आडसकर पॅनलने ४६१ पैकी ३८५ इतके विक्रमी मतदान घेऊन विरोधी पॅनलचा धुव्वा उडवून वर्चस्व कायम राखलं आहे. पॅनल प्रमुख रामधन लाखे, राजेभाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाल्याने आनंद साजरा करण्यात आला.

खोडस, वाघोली ग्रुप सेवा सहकारी सोसायटी या गावातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या म्हत्वाच्या संस्थेची निवडणूक पार पडली. यामध्ये स्व. बाबुरावजी आडसकर पॅनल व शेतकरी बचाव पॅनल अशी सरळ लढत झाली. बाबुरावजी आडसकर पॅनलने सुरवातीला चार जागा बिनविरोध आणून निवडणूक एकतर्फी होणार व ही केवळ औपचारिकता असल्याचे दाखवून दिले होते. तसेच घडले. मंगळवारी ( दि. १४ ) सकाळी ७ ते ४ यासाठी मतदान घेण्यात आले. सायंकाळी ६ च्या सुमारास निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये आडसकर पॅनलचे वशिष्ठ शंकरराव लाखे, दिलीप बाबुराव लाखे, दादासाहेब प्रल्हाद काटे, फुलचंद आत्माराम लाखे, हरिभाऊ रामा गायसमुद्रे, आबासाहेब सखाहारी कोकाटे, जालिंदर भगवान पवार, सौ. शोभा सूनील लाखे, सौ. सुनिता पंढरी गव्हाणे, अण्णासाहेब सोपान गव्हाणे, सुग्रीव अर्जुन गव्हाणे, अरुण त्रिंबक गव्हाणे, अरविंद सखाराम शिंदे सर्वच्या सर्व उमेदवार विक्रमी मतांनी विजयी झाले. एकूण ४६१ मतदान पैकी तब्बल ३८५ इतके विक्रमी मताधिक्य मिळवून विरोधी पॅनलचा धुव्वा उडविला. विजयी उमेदवारांना शेतकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »