खोडस येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राकेश लाखे यांची निवड
लोकगर्जना न्यूज
आडस : धारुर तालुक्यातील खोडस येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य आणि उपाध्यक्ष पदांची बिनविरोध निवड झाली तर अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये १२ मत घेऊन रमेश आडसकर यांचे समर्थक राकेश नानासाहेब लाखे हे विजयी झाले. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
खोडस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची व्यवस्थापन समिती निवडीसाठी मंगळवारी ( दि. ४ ) शाळेत बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते अंगद बाबुराव लाखे, अंगद शाहूराव लाखे, इश्वर डिगांबर पांचाळ, लहू सुभाष गायसमुद्रे , रंजना आकाश कांबळे, भाग्यश्री मुकेश कांबळे, स्वाती महादेव गायसमुद्रे, अर्चना गौतम गवळी, पवार सुनिता बालासाहेब, नितीन हरिभाऊ गायसमुद्रे यांची सदस्य तर उपाध्यक्ष पदी रानबा बापुराव गायसमुद्रे यांची सर्वानुमते अविरोध निवड केली. अध्यक्ष पदासाठी दोघे इच्छुक असल्याने आणि दोघांपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. यासाठी राकेश नानासाहेब लाखे आणि दादासाहेब प्रल्हाद काटे असे दोघांचे अर्ज आले. गुप्त मतदान घेण्यात आले. राकेश लाखे यांना तब्बल १२ मते मिळाली तर दादासाहेब काटे यांना केवळ ३ मते मिळाली. तब्बल ९ मते अधिक घेऊन रमेश आडसकर यांचे समर्थक राकेश नानासाहेब लाखे हे विजयी झाले. ते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाले. अध्यक्ष पदी निवड झाल्याची घोषणा होताच रामधन मोहनराव लाखे, वचिष्ट शंकर लाखे, हनुमंत दत्तात्रय कोकाटे, दिलीप बाबुराव लाखे, आश्रुबा किसन गोतावळे, अनिल श्रीराम पवार, विक्रम कांबळे, राजेभाऊ देविदास लाखे, निर्मेश्वर लाखे यांच्यासह आदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.