खिचडी कोणाची शिजत होती की,नव्हती? शिक्षीका व कामगार महिलेत शाळेतच राडा
लोकगर्जनान्यूज
किल्ले धारूर : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोड हिंगणी शाळेत खिचडी कामगार महिला आणि एका शिक्षिकेमध्ये वाद झाला.दोघींनी शाळेच्या प्रांगणात अक्षरशः एकमेकीचे केस ओढत मारहाण केली. व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना पुरेसा दर्जेदार अन्न देण्याची मागणी करणाऱ्या शिक्षिकेला पतीसह उपस्थित राहत पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेने हुज्जत घातली यामागे शाळेतील अंतर्गत राजकारण असल्याचे ग्रामस्थ म्हणत असल्याने नेमकी खिचडी कोणाची शिजत होती की,नव्हती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.
तालुक्यातील जोड हिंगणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून खिचडी शिजवणारी महिला विद्यार्थ्यांना पुरेशी खिचडी न देणे बिस्किट देण्याच्या दिवशी अक्षरशः दोन बिस्किटावर विद्यार्थीची बोळवण करणे यासह दर्जेदार पोषण आहार न देता ओबडधोबड प्रमाणात विद्यार्थ्यांच्या ताटात खिचडी टाकणे हा प्रकार सातत्याने होत.याबाबत शाळेतील एका शिक्षिकेने महिलेस विद्यार्थ्यांना पोट भरून पुरेसा पोषण आहार देण्याची मागणी करत पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेला मागील पंधरा दिवसांपूर्वी विनंती केली होती. तेंव्हा पासून खिचडी शिजवणारी महिला शिक्षिके बाबत उलट सुलट चर्चा करत चुकीचे वक्तव्य करत असे असा आरोप आहे.यातच खिचडी शिजवणाऱ्या महिलेचा पती शाळेच्या आवारात लघु शंका करत असल्याबाबत ही महिलेने पतीला समज द्यावी असं सांगण्यात आल. परंतु सगळा गाव ईथे येऊन तेच करतो मग माझ्या पतीने केल्यानंतर तुझ काय दुखत अस म्हणत शिक्षिकेवरच आकस दाखवला होता.गावातील नागरिकांशी याबाबत चर्चा केली असता या प्रकारास मुख्याध्यापक जबाबदार असल्याचे सांगितलं जात आहे.खिचडी शिजवणाऱ्या महिलेने पुरेस अन्न विद्यार्थ्यांना देणे आणि यावर नियंत्रण ठेवणे हे मुख्याध्यापिकेचे काम असताना मुख्याध्यापिका सुद्धा खिचडीमध्ये हात ओले करून घेत असल्याची चर्चा गावातील नागरिकांमधून केली जात आहे. 28 जुलै शुक्रवार रोजी अशाच कारणाने सदरील महिलेने ज्ञानार्जनास आलेल्या शिक्षिकेसोबत हुज्जत घातली यावेळी शिक्षकेने ही त्या महिलेस तू किमान विद्यार्थ्यांना दोन बिस्किट देत जा असे म्हणत विद्यार्थ्यांना पुरेसं अन्न देण्याची पुन्हा मागणी केली असता सदरील महिलेने पतीसह शाळेत शिक्षिकेसोबत हुजत घालत मारहाण केली.यावेळी खिचडी शिजवणाऱ्या महिलेचा पती शाळेमध्ये वाद होण्यापूर्वीच कसा आला हा झालेला वाद पूर्वनियोजित आहे का? असा संशय ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. या झालेल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे धारुर तालुक्यात दिवसभर याचीच चर्चा सुरू आहे. शिक्षिकेने गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन दिले असून त्यात दोघां पासून जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे. मुख्याध्यापक यास कारणीभूत असल्याच्या चर्चेने नेमकी कोणाची खिचडी शिजत नव्हती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.