खा.सौ. रजनीताई पाटील यांना पुन्हा मानाचे स्थान
लोकगर्जनान्यूज
केज : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटी मध्ये नव्याने निवडी करण्यात आल्या असून महाराष्ट्रातील निवडक नेत्यांची यामध्ये वर्णी लागली असून राज्यसभेच्या खासदार तथा जम्मू काश्मीर च्या प्रभारी रजनीताई पाटील यांना संधी देण्यात आली आहे. रविवारी याबाबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने कमिटी जाहीर करण्यात आली आहे. रजनीताई पाटील यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व राज्यसभेच्या खा. रजनीताई पाटील यांचे गांधी घराण्याशी असलेले सबंध सर्वश्रुत आहेत. रजनीताई पाटील यांना पक्ष नेतृत्वाने दुसऱ्यांदा राज्यसभा दिली त्याच बरोबर हिमाचल प्रदेशच्या प्रभारी म्हणून देखील रजनीताई पाटील यांनी यशस्वीपणे काम पाहिले तर सद्या त्यांचेकडे जम्मू काश्मीर च्या प्रभारी म्हणून देखील त्या उत्कृष्टपणे काम पहात आहेत. व आता परत त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वर्किंग कमिटीमध्ये स्थान देण्यात आले असून त्यांच्या या निवडीबद्दल बीड जिल्हा काँग्रेस कमिटी, बीड जिल्हा युवक काँग्रेस, महिला काँग्रेस यांच्या वतीने अभिनंदन करून आनंद व्यक्त केला जात आहे.