राजकारण
खा. रजनीताई पाटील यांची राज्यसभेत काँग्रेसच्या प्रतोद म्हणून निवड

लोकगर्जनान्यूज
केज : खा. रजनीताई पाटील यांच्या खांद्यवर जम्मू काश्मिरच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे. आता त्यांची राज्यसभेच्या प्रतोद म्हणून निवड करुन पुन्हा गांधी कुटुंबाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. या निवडीने बीड जिल्ह्यात कॉंग्रेस पार्टीत उत्साह संचारला आहे.
राज्यसभेत काँग्रेसच्या प्रतोद म्हणून निवड केल्याची माहिती काँग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली असून पक्षाने त्यांना पुन्हा मोठी जबाबदारी दिली आहे. खा. रजनीताई पाटील यांचेवर यापूर्वी देखील मोठ्या जबाबदाऱ्या पक्षाने दिल्या होत्या त्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्यानेच पक्षाने पुन्हा त्यांना राज्यसभेत ही मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांच्या या निवडीमुळे बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला.