
बीड : खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे या दोघांनाही कोरोनाची लागण झाली. ही माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन दिली.
मी व सदानंद दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. काही लक्षणे नसल्याने काळजीचे कारण नाही. आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहनही ट्विट मध्ये सुप्रिया सुळे यांनी केले आहे.