क्राईम
खळबळ! बीड जिल्ह्यातील ‘या’ भागातील बंधाऱ्यात मृतदेह आढळला; घटनास्थळी पोलीस दाखल
लोकगर्जनान्यूज
बीड : तालुक्यातील मुळुकवाडी भागात एका सिमेंट बंधाऱ्यात एक व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना आज रविवारी दुपारी उघडकीस आली. घटनास्थळी नेकनूर पोलीस दाखल झाले आहेत.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील मुळुकवाडी ( ता. बीड ) येथील भोसले वस्ती येथील सिमेंट बंधाऱ्यात सतीश रावसाहेब पोकळे ( वय ५० वर्ष ) रा. बेलगाव ( ता. आष्टी ) यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटना घडून तीन-चार दिवस झाले असावेत असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृतदेह आढळून येताच घटनेची माहिती नेकनूर पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच पो.नि. विलास जाधव कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.