खळबळजनक! स्वच्छता गृहातील बकेट मध्ये अर्भक टाकून अज्ञाताचे पलायन

लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : येथील स्वाराती रुग्णालयातील ३५ नंबर मधील स्वच्छता गृहातील बकेट मध्ये शनिवारी ( दि. ३ ) सकाळी स्त्री जातीचा मृतावस्थेत अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता यांनी भेट देऊन पोलीसांना माहिती दिली. पोलीस अर्भक येथे कोणी टाकलं याचा तपास करत आहेत.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयातील ३५ नंबर हा अपघात विभाग आहे. येथे रुग्ण, नातेवाईक यांची मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञाताने अंदाचे दोन दिवसांचा स्त्री जातीचा अर्भक येथील स्वच्छता गृहातील बकेट मध्ये टाकून पलायन केले. आज शनिवारी ( दि. ३ ) स्वच्छता गृहाची सफाई करताना महिला कर्मचारीस दिसून आल्याने उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे सह आदींनी भेट दिली. यानंतर पोलीसांना पाचारण करण्यात आले. पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून अर्भक कोणी आणला? महिला होती की, पुरुष? याचा शोध घेत आहेत.
अर्भक मृत होते की, पाण्याच्या बकेट मध्ये बुडवून मारलं?
ज्या बकेट मध्ये हे अर्भक आढळले ती पाण्याने भरलेली होती असे सांगितले जात आहे. त्यामुळे पाण्यात बुडवून अर्भकाला मारले की, आधीच अर्भक मृत होते? मृतावस्थेत बकेट मध्ये टाकून गेले. अशीही चर्चा सुरू झाली आहे. परंतु या प्रश्नाचे उत्तर पोलीस तपासानंतर मिळेल.