खळबळजनक! शिक्षक आत्महत्या प्रकरणी शिक्षीका पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल
पती-पत्नी दोघेही शिक्षक पण पत्नी ड्रायव्हरच्या नादी लागल्यामुळे शिक्षक पतीची आत्महत्या
लोकगर्जनान्यूज
धारुर : तालुक्यातील आसरडोह येथील शिक्षकाने एप्रिल महिन्यात आत्महत्या केली. त्यावेळी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली. परंतु मयत शिक्षकाच्या भावाने तक्रार केल्याने धक्कादायक कारण समोर आले असून, याप्रकरणी शिक्षीका असलेल्या पत्नी अन् प्रियकर असलेल्या ड्रायव्हरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. या प्रकाराने धारुर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
चंद्रकांत सुरवसे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. यांची पत्नीही शिक्षीका आहे. यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. दोघेही जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्याने सर्व काही चांगले होते. यांनी एक स्कॉर्पिओ घेतली अन् यावर ड्रायव्हर ठेवला. याच ड्रायव्हर सोबत चंद्रकांत यांच्या पत्नीचे सुत जुळले अन् या दोघा पती-पत्नी मध्ये खटके उडू लागले. हा प्रकार इतक्या टोकाला गेला शिक्षक असलेल्या पत्नीने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला होता. असेही तक्रारीत म्हटले आहे. पत्नीच्या या बाहेरख्याली पणामुळे वैतागून शिक्षक चंद्रकांत सुरवसे यांनी ५ एप्रिल रोजी आसरडोह येथेच गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत तेव्हा आकस्मित मृत्यूची नोंद झाली. परंतु मयत चंद्रकांत सुरवसे यांचे बंधू बंडु सुरवसे यांच्या फिर्यादीवरून पत्नी व तिचा प्रियकर ड्रायव्हर या दोघां विरोधात धारुर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. साडेतीन महिन्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे.