खळबळजनक! बीड जिल्ह्यात या गावात मृतावस्थेत बिबट्या…

बीड : शिरुर व आष्टी तालुक्यात मागे बिबट्याने मागे माणसावर हल्ला केला तर एका बालकाचा बळी घेतल्याचा प्रकार घडल्यापासून बीड जिल्ह्यात बिबट्या म्हटले की, अंगावर काटा उभा राहतो. आज सकाळी जिल्ह्यातील राक्षसभुवन येथे बिबट्या दिसला पण तो मृतावस्थेत त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. माहिती मिळताच वण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन शिवारातील एका ओढ्यात आज दुपारी बिबट्या ग्रामस्थांच्या नजरेस पडला. बिबट्या पहाताच मनाचा थरकाप उडाला व लपून त्यास पहिलं परंतु काहीच हालचाल करत नव्हता. अनेकांना फोन करून बोलावून घेतले. ते सर्वजण लाठ्याकाठ्या घेऊन ओढ्याच्या दिशेने धावले. अंदाज घेऊन तो काहीच हालचाल करत नसल्याने हिंमत दाखवत तरुण त्या दिशेने गेले असता तो मृतावस्थेत होता. याची गावात माहिती मिळताच ग्रामस्थांनी बिबट्याला पहाण्यासाठी एकच गर्दी केली. परंतु या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला. यामागील कारण काहीच स्पष्ट झाले नाही. दुपारी याबाबत वण अधिकाऱ्यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी धाव घेतली आहे. ते आता यामागील कारण शोधून काढतील. परंतु मृतावस्थेत बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली असून, या परिसरात बिबट्याचा वावर होता हे निश्चित झाले.