खळबळजनक! बीडमध्ये गोळीबार
लोकगर्जनान्यूज
बीड : शहरात रात्री दोन गट आमनेसामने आल्याने मोठा राडा झाला. यावेळी एका गटाने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. या राड्यात चारजण जखमी असून संशयितांची रात्री धरपकड करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शहरातील कालिका नगर येथे रात्री अंदाजे साडेदहा वाजता दोन गट आमनेसामने आले. यावेळी एका गटाने गोळीबार केला. गोळी लागून दोन जण जखमी झाले. दोघांवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले. या राड्यात चौघे जखमी आहेत. हा मामा-भाचे गँगचा वाद असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी आसाराम गायकवाडला पोलीसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गोळीबार झाल्याची बातमी शहरात पसरताच खळबळ उडाली.