क्राईम
खळबळजनक: बँकेची शाखा फोडून चोरट्यांनी केला हात साफ;बीड जिल्ह्यातील घटना

लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लॉकर तोडून लाखोंची रोकड व सोनं लंपास झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, लिंबागणेश ( ता. बीड ) येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शाखेच्या पाठीमागील लोखंडी खिडकी गॅस कटरच्या सहाय्याने कट करुन बँकेत घुसले. आतील लॉकर तोडून रोकड व सोनं लंपास केल्याने मोठा ऐवज चोरीला गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु नेमका आकडा अद्याप समोर आला नाही. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चोरट्यांनी चक्क बँक शाखाच फोडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.