खळबळजनक! पोलीस बेवारस दुचाकी पहाण्यासाठी गेले अन् समोर भलतंच काहीतरी दिसलं…
गेवराई : शहरालगत असलेल्या एक निर्जन ठिकाणी बेवारस दुचाकी असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. ते पहाण्यासाठी गेलेल्या पोलीसांना भलतंच वेगळ दिसल्याने काहीसं त्यांच्याही मनाचा ठोका चुकला असेल, निरखून पाहिले असता एक मानवी सांगाडा झाडावर लटकलेला होता. हे वृत्त गेवराई शहरात पसरताच खळबळ माजली आहे.
शहराच्या लगत पालखा डोंगर म्हणून ओळखले जाणारे एक निर्जन ठिकाण आहे. या डोंगराजवळ एक दुचाकी बेवारस अवस्थेत असल्याची माहिती कोणीतरी गेवराई पोलीसांना दिली. याची शहानिशा करण्यासाठी पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले. दुचाकी कोणी घेऊन आलेला आहे का? परिसराची पाहणी करताना एक धक्कादायक चित्र समोर दिसले. मानवी सांगाडा खाली पडलेला आहे तर मुंडकं झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलं. पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती कळवून तो सांगडा ताब्यात घेतला आहे. त्याची तपासणी करण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. या अहवालानंतर हा सांगडा कोणाचा हे समजेल परंतु काही दिवसांपूर्वी एक मिसींग दाखल असून पोलीस प्रशासन त्या दिशेने तपास करीत आहे.